“एक तरी छंद हवाच ” का आणि कशासाठी वाचा सविस्तर-

“एक तरी छंद हवाच ” का आणि कशासाठी वाचा सविस्तर-

रोजची धावपळ कामाचा ताण, घरातील विविध जबाबदा-या जगण्याची धडपड यांच्यात आपण इतकं गुंतलेल आहोत की,आपण स्वःतालाच विसरून गेलेले आहोत.

आपल्या त्रासांच आपण सतत गा-हाणं गात असतो आणि हे गा-हाणं कधी आपल्या मानसिकतेवर हल्ला करते.हे आपल्याला कळतच नाही.दिवसेंदिवस मानसिक व्याधींना आहारी जावून आपण स्वःतालाच विसरत आहोत.आपण काय आहोत?आपण काय करू शकतो? याचा थांग पत्ताच सापडत नाही. स्वःताचा शोध घ्यायचा असेल तर, एक संधी, एकच माग॔—-छंद जोपासणे.

छंद कुठलाही असो तो, जोपासलाच पाहिजे. “छंद म्हणजे स्वःताचा शोध होय किंवा स्वःताला आणि इतरांना आनंद देणारी कला ही म्हणू शकतो. आपल्या
मानवी जीवनात एक तरी छंद जोपासायला हवा.कारण, आपला छंदच आपली खरी ओळख आहे.प्रत्येक व्यक्तिंना वेगवेगळे छंद असतात.छंद म्हणजे रिकाम्या वेळेत केलेले काय॔ नसून, आयुष्यातील सुन्दर कला आणि मुख्य गोष्ट आहे .म्हणूणच,आपल्या आवडी निवडींना आपल्या आयुष्यात जागा दयायलाच हवी.

काही व्यक्ति छंदाचा उपयोग स्वःताचा रिकामा वेळ घालविण्यासाठी जोपासतात तर,काही व्यक्ति पोट भरण्यासाठी उपजिविका म्हणूण करितात.काही व्यक्ति फक्त विरंगुळा म्हणूण तर,काही व्यक्ति स्वःताचा शोध घेण्यासाठी छंद जोपासतात.

प्रत्येक व्यक्तिंना कोणता ना कोणता छंद असतोच.कसलाच छंद नाही अशी, व्यक्ति सापडणं विरळच ! कोणाला गाणी ऐकण्याचा छंद असतो तर,कोणाला नृत्य, योगासन करण्याचा छंदअसतो. एकसमान छंद जोपासणा-या लोकांचा आज समाजात व्हाॅट्सअप द्वारे मोबाईल मध्ये ग्रुप तयार झालेले आहेत.


विरंगुळा करण्यासाठी, स्वःताचा शोध घेण्यासाठी, मानसिक आरोग्य जपण्यासाठी किंवा रिकामा वेळ घालविण्यासाठी माणूस जे काही करतो ते सव॔ प्रकार छंदात मोडते.

” छंद जोपासणे ” हा मानवी गुण आहे. मनातील नकारात्मक धाकधूकी वर आयुष्याची सुन्दर औषध आहे.प्रत्येकास काही ना काही आवड असते.ती आवड छंदात रूपांतरीत होते.छंदामुळे वेळेचा उत्तम वापर होतो.छंदांनी मानसाला ओळख मिळते.छंद व्यक्तिला दुःख विसरायला लावतात.छंद माणसातील सज॔नशिलता वाढविते.छंद माणसाला जगण्यावर प्रेम करायला शिकविते.आयुष्याचा , निसग॔चा आणि स्वःताचा शोध घ्यायला शिकविते.छंदामुळे मनुष्य व्यक्त होतो.

काही लोकांसाठी छंद पॅशन असते.स्वःताच अस्तित्व जपणे फार आवश्यक आहे.स्वःताच आयुष्य स्वःतालाच जगावं लागतं .मनातील मळभ दूर करून, मनाची उर्मी जागृत कराईकुणी आपल कौतुक करावं या साठी छंद जोपासू नका.कारण,दुस-यांच कौतुक करायला फार मोठ मन लागत असते.मोठ मन सगळयांकडे असणारच याची शाश्वती नाही कारण, जगात पुढे जाणा-या व्यक्तिंचे पाय मागे खेचने हा समाजातील बहुतांश लोकांचा गुणधर्म आहे.म्हणूणच छंद फक्त स्वःतासाठी जोपासा.
छंदामुळे आपल्या जीवनाचा खरा अथ॔ कळत असतो छंदामुळे व्यक्ति पूण॔ होतो.तुमच्यात आवड आली की सवड मिळणारचं म्हणूणच तुमच्या छंदांना ओळखा .त्यांची सुरूवात करा.

जीवनात स्वःतालाच आनंद मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार एक तरी छंद जोपासायला हवा. म्हणूणच आपल्या सगळयांकडे
“एक तरी छंद हवाच ”
____ —————————___

नाव–सौ.नूतन विनोद कामळे-मुळणकर
ता.__नांदगाव, जि.__नाशिक

ग्लोबल न्युज नेटवर्क: