पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्यामुळे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजू कारेमोरे प्रकाश झोतात आले होते. मात्र आता त्यांचा पुन्हा एकदा नवा अवतार आज लोकांना पाहण्यास मिळाला. एका लग्नाच्या वऱ्हाडीत राजू कारेमोरे तुफान नाचताना पाहण्यास मिळाले. हा व्हिडीओ शहरात व्हायरल झाला आहे. तर संध्याकाळी अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करतांनाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या पुन्हा अधिकाऱ्यांना अश्लील भाषेत शिविगाळ करतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नववर्षाच्या सुरुवातीला पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता बांधकाम विभागातील कर्मचारी कंत्राटदाराला अश्लील भाषेत शिवीगाळ करतांनाचा त्यांच्याच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मोहाड़ी तालुक्यातील धोप गावातील खराब रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी व कंत्राटदाराला जाब विचारतांना पुन्हा आमदार साहेबांची जीभ घसरली आहे. तर या आधी म्हणजे, ३१ डिसेंबर २०२१ च्या रात्री मित्रांचा बचाव करण्यासाठी मोहाडी पोलीस ठाण्यात आमदार कारेमोरे गेले असताना त्यांनी पोलीस निरीक्षकाला महिला पोलिसांच्या समोर अश्लील शिवीगाळ केली होती. त्यामुळे आमदार महोदयांना ३ जानेवारीची रात्र तुरुंगात काढावी लागली होती.