‘पुन्हा गुजरात कनेक्शन’; मालिकांच्या ट्विटने पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ

 

मुंबई | राज्यभरात मुंबई क्रुझ प्रकरणानं खळबळ माजवली आहे. याप्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे तसेच भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप करण्यात आले. त्यांनंतर हे प्रकरण आणखीनच चिघळलं.आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिकांनी अनेक आरोप केले आहेत. अनेक कागदपत्र दाखवत त्यांनी वानखेडेंवर आरोप लगावले आहेत.

ड्रग्ज प्रकरणानं देशभरात खळबळ माजवली आहे. ड्रग्ज प्रकरण देशभरात तापलेलं असतानाच आता गुजरातमध्ये पुन्हा एकदा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर नवाब मलिकांनी गुजरात प्रकरणी उडी घेत भाजवर ताशेरे ओढले. आता पुन्हा एकदा गुजरात ड्रग्ज कनेक्शनवरुन नवाब मलिक यांनी ट्विट केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

गुजरातमधील द्वारका जिल्ह्यातील खंभालिया येथे ३५० कोटी रुपयांचे ६६ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं. यासोबतच हेराॅईनही ताब्यात घेण्यात आलं आहे. यावरुनच नवाब मलिक यांनी ट्विट केलं आहे. पुन्हा गुजरात कनेक्शन… उडता गुजरात, असं ट्वीट करत नवाब मलिक यांनी गुजरात ड्रग्ज प्रकरणावरुन जोरदार टीका केली आहे. सध्या द्वारका ड्रग्ज प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण तापलं असून आरोप-प्रत्यारोपांची झोड सुरु झालेली पहायला मिळत आहे.

Team Global News Marathi: