रवींद्र जडेजाची बहीण आणि पत्नी लढवताहेत एकमेकांविरोधात निवडणूक

 

गुजरात | गुजरातमध्ये निवडणुकांचा प्रचार चांगलाच शिगेला पोहचला आहे. भाजपसह काँग्रेस आणि आम आदमी पार्टी देखील मैदानात उतरली असल्यामुळे प्रचारात चांगलाच धुरळा उडताना दिसतोय. संपूर्ण गुजरातमध्ये चर्चा आहे ती जामनगर मतदार संघाची.जामनगरमधून क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या कुटुंबातील २ सदस्य एकमेकांसमोर उभे असल्यामुळे या मतदार संघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाला भाजपने यंदाचे जामनगरचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या नैनाब जडेजा या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. नैनाब आणि रवींद्र जडेजा भाऊ बहीण असल्यामुळे जामनगरमधील ही लढत रवींद्र जडेजाची पत्नी विरुद्ध बहीण अशी असणार आहे.

एकाच घरातील दोन महिला राजकारणात आमने सामने आल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील सुरु झाल्या आहेत.नैनाब यांनी रिवाबा यांच्यावर त्या प्रचारासाठी सहानुभूती मिळवण्यासाठी मुलांचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच काँग्रेसने या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

Team Global News Marathi: