‘महाराष्ट्र संभाळता आला नाही आणि बिहारला…’ भावना गवळी यांचा टोला

 

शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे (२३ नोव्हेंबर) बिहारला गेले होते. त्यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची ते भेट घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना खासदार अनिल देसाई, खासदार प्रियंका चर्तुवेदी हेसुद्धा गेले होते. या भेटीवरून शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. “महाराष्ट्र संभाळता आला नाही आणि बिहारला चालले आहेत. आपले घर संभाळता आले नाही आणि आमच्यावर गद्दारीचे आरोप करता. खरे गद्दार तुम्ही आहात.” असे त्या म्हणाल्या.

“आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर निवडून आल्यामुळे भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. त्यामुळे खरे गद्दार कोण? हे सर्वांना दिसले आहे. आम्ही शिवसेना सोडली नसून बाळासाहेबांचे विचार विकले नाही. आम्ही खरी शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन निघाले आहोत. म्हणून यांच्या पोटात दुखत आहे.” असेही त्या म्हणाल्या.

आमदार आदित्य ठाकरे यांनी बिहार दौरा निश्चित केल्यानंतर शिंदे गटाकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. तर भाजपनेही या संधीचा फायदा घेत शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला. लालू प्रसाद यादव यांनी तर हिंदूत्वाला विरोध केला होता आणि आता आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना का भेटायला जात आहेत? असे भाजपने विचारले आहे.

 

Team Global News Marathi: