राऊतांच्या ट्विटने सर्वांच्या नजरा आता पत्रकार परिषेद घेऊन करणार मोठा खुलासा

 

मुंबई | राज्यात ठाकरे सरकार आणि भारतीय जनता पक्षामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या होणाऱ्या कारवायांवरून मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक नेते आणि मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेने कारवाई केली असून यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळातील चर्चांणा उधाण आलं आहे. संजय राऊत यांनी, खेळ लवकरच सुरू होणार, पत्रकार परिषद घेणार, अशा शब्दात सूचक असं ट्विट केलं आहे.

खेळ नुकताच सुरू झाला आहे, पंतप्रधान कार्यालयाकडे केंद्रीय एजन्सीजच्या अधिकारांचा गैरवापर करून काही जणांना वेठीस धरण्याचे पुरावे सादर केले. सोबतच काही अधिकारी ‘वसुली एजंट्स’ मार्फत खंडणी आणि ब्लॅकमेलिंगमध्ये गुंतलेले आहेत, याचे पुरावे देखील सादर केले असल्याचं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की, पंतप्रधान कार्यालयाकडे जे काही पुरावे दिले आहेत त्याबाबतचा अधिक तपशील शेअर करण्यासाठी लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत आता नेमका काय खुलासा करणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, नवाब मलिक आत असताना आज मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने कारवाई केली.

Team Global News Marathi: