मनसेच्या पोस्टर्सची बीडमध्ये चर्चा ” भ्रष्टाचाराची चौकशी ईडीने करावी”

 

राज्यात आघाडीचे सरथर स्थापन झाल्यापासून इंडियन सुरु केलेल्या कारवाईची आता संपूर्ण राज्यभरात चर्चा सुरु झाली आहे अशातच आता ईडीची कारवाई जरी मोठ्या शहरापुरती मर्यादित असली तरी त्याची चर्चा आणि परिणाम आता छोट्या गावांमध्ये पाहायला मिळतायेत.

बीडच्या नांदुरघाट परिसरामध्ये तिथल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी ही थेट ईडीने करावी असे बॅनर्स मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी लावले आहेत. त्याची चर्चा परिसरात चांगलीच रंगली आहे. नांदुरघाटमधील विकास काम करताना कोट्यावधी रुपयांची अनियमितता झाल्याची तक्रार यापूर्वीच सुमंत धस यांनी केजच्या तहसिलदाराकडे केली होती.

आता याच मागणीसाठी सुमंत धस यांनी काही दिवसांपूर्वी नांदुरघाटमध्ये उपोषण केले होते. या उपोषणा वेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे मान्य केले कुठे मात्र त्याचा पुढे काहीच उपयोग झाला नाही असं सुमंत धस यांचे मत आहे. म्हणूनच सुमंत धस यांनी आता या कामांची चौकशी ईडीने करावी अशी मागणी केली आहे.

ED/ ईडीने थोडं लक्ष,
आमच्या नांदूरघाट सर्कल मध्ये पण घालावं
मोठे माशे जाळ्यात अडकत आहेत पण लहान माशे पण करोडोंचा भ्रष्टाचार करून माला-माल झाले आहेत.
नांदूरघाट सर्कल मध्ये मागच्या ५ वर्षात १०० करोड़ पेक्षा जास्त रुपयांची कामे झाली,
पण प्रत्यक्षात मात्र कुठे कामे दिसत नाहीत.
नांदूरघाट गावा अंतर्गत ६०० मीटर रस्ता साठी ५ कोटी रुपये खर्च करून काम चालू आहे ते पण प्रचंड प्रमाणात बोगस. पाणी पुरवठा योजने साठी २ ते ३ कोटी रूपये खर्च करून पण नांदूरघाट गावाला पाणी विकत घ्यावे लागते.
नांदूरघाट जिल्हा परिषद सदस्य याचा असा कोणता व्यवसाय आहे की त्यातून २ करोड रुपयाचे घर व कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे का भ्रष्टाचाराचा पैसा आहे.
ED/ई डी ने नांदूरघाट सर्कल मध्ये झालेल्या कामांची पण चौकशी करावी कारण पैसा शासनाचा आहे.
करोडो रूपये खर्च करून पण कोसो दूर विकास सापडत नाही.

Team Global News Marathi: