राऊतांच्या चौकशीतून नवी माहिती समोर, ईडीच्या दोन ठिकाणी धाडी

 

पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणी ईडीने आज मुंबईत दोन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.तसंच नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातही हेरॉल्ड हाऊसवर छापा टाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ईडीच्या टीमने तीन ठिकाणी छापे टाकले आहे. दोन छापे हे पत्राचाळ प्रकरणामध्ये आहे. तर एक छापा हा नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी मुंबईमधील हेरॉल्ड हाऊसवर छापा टाकण्यात आला आहे.

पत्राचाळ प्रकरणी ईडीने दोन ठिकाणी धाडी टाकल्या आहे. दादर आणि कांजूरमार्ग या दोन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. या धाडी राऊत यांच्या घरी टाकल्या आहेत का ही माहिती अजून मिळू शकली नाही. मात्र, पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी केली होती. या चौकशीतून काही माहिती समोर आली होती. त्यानुसार दोन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.

पत्राचाळ प्रकरणात काही बैठक झाल्या होत्या, काही कागदपत्र हाती घ्यायची आहे. त्यानुसार ही कारवाई केली आहे. पत्रा चाळ किंवा सिद्धार्थ नगर हे मुंबईतल्या गोरेगाव भागात आहे. पत्रा चाळीतल्या 672 भाडेकरूंना नवीन घर बांधून द्यायचं आणि उरलेली जागा खासगी विकासकांना विकायची, असा करार गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (GAPCL) ने म्हाडासोबत 2007 साली केला. जीएपीसीएल, म्हाडा आणि भाडेकरू या तिघांमध्ये हा करार झाला होता, पण 14 वर्षांनंतरही हा करार कागदावरच राहिला.

 

Team Global News Marathi: