राऊतांचे बिझनेस पार्टनर सुजीत पाटकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

शिवसेना नेते अमी खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता त्यांचे बिझनेस पार्टनर सुजीत पाटकर यांच्याविरोधात मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार बहरतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सुजीत पाटकर आणि अन्य काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सोमय्या यांनी दिलीय. पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीनं बोगस कागदपत्रं दाखवून खोट्या पद्धतीनं कोविड सेंटरचं कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. पुरेशी क्षमता नसल्यानं अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

 

Team Global News Marathi: