राऊतांपाठोपाठ शिवसेनेचा हा बडा नेता तुरुंगात जाणार – रवी राणा

 

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने मध्यरात्रीनंतर अटक केली आहे. संजय राऊतांची रविवारी सकाळपासून चौकशी सुरु होती. अखेर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. यावर आता आमदार रवी राणा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी राऊतांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

रवी राणा म्हणाले, की संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बिल्डरांकडून आणि व्यवसायिकांकडून अवैध पैसा गोळा केला आणि मोठा भ्रष्टाचार केला. याशिवाय महाविकास आघाडी सरकारची स्थापना करण्यासाठी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही मोठी रक्कम घेतली होती, असा आरोपही रवी राणा यांनी केला आहे.

याशिवाय संजय राऊत यांच्याप्रमाणेच अनिल परब यांनीही अनेक घोटाळे केले आहे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे राऊतांपाठोपाठ परब यांच्यावरही अटकेची टांगती तलवार असल्याचं भाकीत आमदार रवी राणा यांनी केलं आहे. काय आहे प्रकरण? मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे.

पत्राचाळ परिसरातील 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून 672 फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. मात्र 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले.

संजय राऊतांवरील कारवाईवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा हल्ला

काँग्रेसचे माजी मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण

Team Global News Marathi: