हिटलरच्या सोन्याच्या घड्याळाचा इतक्या लाख डॉलरला लिलाव

 

हिटलरच्या सोन्याच्या घड्याळाचा अमेरिकेत 1.1 दशलक्ष डॉलरला लिलाव करण्यात आला. एका अत्रात खरेदीदाराने हे घड्याळ खरेदी केले. या सोन्याच्या घड्याळावर नाझी पार्टीचे चिन्ह असलेले स्वस्तिक कोरुन अंकित करण्यात आले आहे. तसेच हिटलरच्या नावाची अद्याक्षरे असलेली एएच ही एक्षरेही त्यावर कोरण्यात आली आहेत.

हिटलरच्या 44 व्या वाढदिवशी म्हणजे 20 एप्रिल 1933 रोजी हे घड्याळ हिटलरला भेट म्हणून देण्यात आले होते. जर्मनीच्या इतिहासातील हा पहिला पुरस्कार होता, असे या लिलावाच्या आयोजकांनी सांगितले. या घड्याळावर तीन वेगवेगळ्या तारखा नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामध्ये हिटलरचा जन्मदिन, हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर झाल्याची तारीख आणि मार्च 1933 मध्ये नाझी पार्टीने जर्मनीतील निवडणुका जिंकल्याची तारीख या घड्याळावर नोंदवण्यात आली आहे.

मे 1945 रोजी हिटलरच्या बरगॉफ येथील निवासस्थानी फ्रान्सचे 30 सैनिक घुसले होते. त्यावेळी हिटलरची स्मृती म्हणून हे घड्याळ तेथून जमा करून घेण्यात आले होते. तेंव्हापासून हे घड्याळ अनेकांनी खरेदी केले आणि आतापर्यंत अनेक जणांनी त्याची खरेदी आणि विक्री केली होती.

ज्यू नेत्यांनी या लिलाव प्रक्रियेवर टीका केली होती. हा लिलाव रद्द करण्यात यावा असी मागणीही ज्यू नेत्यांनी केली होती. मात्र इतिहासाचे जतन करण्यात यावे, हा या लिलावाचा हेतू होता. पुरातन वस्तू सुरक्षित हाती रहाव्यात अकिंवा संग्रहालयाला दान केल्या जाव्यात अशी अपेक्षा होती, असे लिलावाच्या आयोजकांनी म्हटले आहे.

.राऊतांपाठोपाठ शिवसेनेचा हा बडा नेता तुरुंगात जाणार – रवी राणा

संजय राऊतांवरील कारवाईवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा हल्ला

Team Global News Marathi: