मनसे नेते अमेय खोपकर आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्यात मागच्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक होत असलेली पाह्यला मिळत होती. आज पुन्हा एकदा अमेय खोपकर यांनी ट्वीट करत मिटकरी यांना थेट राष्ट्रवादीचा छोटूसा भोंगा म्हणून डिवचले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भोंग्यावरील वक्तव्य सध्या जाम चर्चेत आहे. त्यात अमेय खोपकर यांनी मिटकरी यांनाच भोंग्याची उपमा दिल्याने यांच्यात वाद अजून चिघळण्याची शक्यता आहे.
“राष्ट्रवादीचा छोटूसा भोंगा आठवतोय का कुणाला? अबब..केवढं ते भाषेचं तेज पण ती सगळी निघाली बोलाचीच कढी. असेल धमक तर पुन्हा चुरुचुरु बोलून दाखवा की राव. पेंग्विन पण तिथेच आहे आणि मातोश्री पण तिथेच आहे… जिजामाता उद्यानात रंग बदलणाऱ्या या सरड्यासाठी वेगळं दालन करणार आहेत म्हणे.”, असा टोला अमेय खोपकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.
राष्ट्रवादीचा छोटूसा भोंगा
आठवतोय का कुणाला?
अबब..केवढं ते भाषेचं तेज
पण ती सगळी निघाली बोलाचीच कढी…
असेल धमक तर पुन्हा चुरुचुरु बोलून दाखवा की राव…
पेंग्विन पण तिथेच आहे आणि मातोश्री पण तिथेच आहे…
जिजामाता उद्यानात रंग बदलणाऱ्या या सरड्यासाठी वेगळं दालन करणार आहेत म्हणे! pic.twitter.com/uoRkiY2Ok6— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 8, 2022
या व्हिडिओमध्ये अमोल मिटकरी मंत्री आदित्य ठाकरे यांची नक्कल करताना दिसून येत आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. मात्र आज शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे सरकार आहे. यावरूनच रंग बदलणारा सरडा अशी उपमा देत अमेय खोपकर यांनी अमोल मिटकरी यांना पुन्हा असे चुरुचुरु बोलून दाखवा असे आव्हान दिले आहे.