राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी ‘त्या’ प्रसंगावरून व्यक्त केली काळजी

 

राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी सात उमेदवारांमध्ये काल मतदान झाले असून अनेक घडामोडी आणि राजकीय नाटकानंतर याचा निकाल लागला. यात राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत. यावरच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार ट्विट करून म्हणाले की, “राज्यसभेच्या निवडणुकीत विजयी झालेले मविआचे नवनिर्वाचित खासदार प्रफुल पटेल, संजय राऊत आणि इमरान प्रतापगढि यांच्यासह भाजपच्याही विजयी उमेदवारांचं मनःपूर्वक अभिनंदन! फोडाफोडी आणि दबावाचं राजकारणही या निवडणुकीत दिसलं, हे लोकशाहीसाठी नक्कीच चिंताजनक आहे.”, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की, “विशेष म्हणजे आमदार लक्ष्मण जगतापजी आणि आमदार मुक्ताताई टिळक या आजारी असल्याने त्यांना त्रास होऊ नये म्हणून मतदानासाठी आणणं टाळायला हवं होतं, पण तरीही त्यांनी अंबुलन्समधून येऊन मतदान केलं, ही कृती मनाला खूप भावली. ते दोघेही लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो.”

Team Global News Marathi: