छत्रपती संभाजीराजेंनंतर आता खासदार उदयनराजेंनीही केलं ट्विट

 

राज्यसभा निवडणुकीत शुक्रवारी मध्यरात्री मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले. तर भाजपाचे देखील तीन उमेदवार विजयी झाले आहे. शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती. तर, धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाली.

शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराच्या पराभवानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll, असं संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे. त्यानंतर आता खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत भाजपाच्या विजयी उमेदवारांचे कौतुक केलं आहे.

भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मा. श्री. पियुषजी गोयल, मा. डॉ. अनिलजी बोंडे व मा. श्री. धनंजय महाडिक हे राज्यसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! असे ट्विट खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. तर दुसरीकडे राज्यसभेच्या निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाने काल जो घोडेबाजार केला, तो राज्यातील सर्व जनतेने पाहिला. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला. काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहे. ठीक आहे आज ते जिंकले असतील. पण आम्ही उद्या पाहू, असं संजय राऊत म्हणाले.

 

Team Global News Marathi: