राष्ट्रवादीचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांना, आढळराव पाटलांनी व्यक्त केली खदखद

 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विरोधात बंड पुकारल्यानंतर आता रास्तवराडी आणि काँग्रेसमुळे सेनेचे होत असलेल्या नुकसानीवर शिवसेना नेते उघडउघड बोलू लागले आहे अशातच आता यावर माजी खासदार आढळराव पाटील यांनी सुद्धा आपली खदखद व्यक्त करत थेट राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त राष्ट्रवादीचा फटका हा पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांना बसला असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं.

राज्यात राजकीय भूकंप घडला आहे. अशा परिस्थितीतही पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याला १७० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तो फक्त राष्ट्रवादीच्या खासदार आणि आमदारांना दिला असल्याचे आढळराव म्हणाले. आता आपल्या पक्षावर संकट आलं आहे, अशा स्थितीत आपण सर्वांनी शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे असं आवाहन आढळराव पाटील यांनी केलं.

शिवसेनेवर संकट आलं आहे, यामध्ये मी सगळ्यांच्या पुढे राहणार असल्याचे आढळराव पाटील म्हणाले. गेल्या तीन दिवसापासून 150 च्या पुढे जीआर पालकमंत्री अजित पवारांनी काढले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासरदारांना त्यांनी मोठा निधी दिला असल्याचे आढळराव पाटील म्हणाले. आम्ही किती सहन करायचे, याचाही विचार होणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले.

Team Global News Marathi: