मोठी बातमी! अजित पवारांना कोरोनाची लागण

मोठी बातमी! अजित पवारांना कोरोनाची लागण

राज्यात सत्तासंघर्ष असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची बाधा झाली आहे

मुंबई : राज्यात सत्तासंघर्ष असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. अजित पवारांनी ट्विट करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. अजित पवारांची सध्या प्रकृती चांगली असून ते डॉक्टारांचा सल्ला घेत आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी (Corona test) करून घ्यावी, असे अजित पवार यांनी आवाहन केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: