राष्ट्रवादीचं उद्या मुंबईत शिबीर; मात्र अजितदादा राहणार का उपस्थित ?

 

मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र मंगळवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रवादीतच राहाणार असल्याचं म्हटलं आहे.मात्र अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतरही राष्ट्रवादीमध्ये सर्व अलबेल नसल्याचं चित्र आहे. उद्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मुंबई विभागाचं शिबीर होणार आहे. मात्र या शिबीरामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं नाव नसल्याचं समोर आलं आहे. अजित पवार हे या शिबीराला अनुपस्थित राहणार असल्याचं वृत्त समोर आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

उद्या राष्ट्रवादीचं शिबीर उद्या राष्ट्रवादीच्या मुंबई विभागाचं शिबीर होणार आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षेखाली हे शिबीर होणार आहे. मात्र या शिबीरामध्ये अजित पवार यांचं नावच नसल्याचं समोर आलं आहे. उद्याच्या शिबीराला अजित पवार अनुपस्थित राहणार आहेत.यापूर्वी देखील अजित पवार यांनी आपला सासवडचा दौरा अचानक रद्द केला होता. तिथे ते शेतकरी मेळाव्यात सहभागी होणार होते. विशेष म्हणजे या शेतकरी मेळाव्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळे या देखील हजर होत्या. मात्र अजित पवार यांनी अचानक आपला दौरा रद्द केल्यानं चर्चा सुरू झाली होती.

आता पुन्हा एकदा अजित पवार अनुपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेमध्ये काय म्हटलं? राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये आपण राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा अजित पवार चिंतन शिबीराला उपस्थित राहणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Team Global News Marathi: