राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार यांनी निवृत्ती स्वीकारल्यावर राष्ट्रवादीबरोबरच आघाडीत सुद्धा पुढचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष सुप्रिया सुळे किंवा प्रफुल्ल पटेल असतील अशी जास्त शक्यता व्यक्त होत आहे. तशी चर्चा सुरु आहे. या दोघांच्या नावाची प्राथमिक चर्चा आहे. शरद पवार अध्यक्ष पद पुन्हा घेण्यास इच्छुक नसल्याने नवा अध्यक्ष कोण याची चर्चा सुरु झाली आहे. त्यानुसार दिल्लीत सर्वपक्षीय संबंध प्रफुल्ल पटेल यांचे आहेत.
तसेच कार्यकर्त्यांची नाराजी कमी करायची असेल तर सुप्रिया सुळे यांच्या नावाचा विचार करावा असा मतप्रवाह पक्षात आहे. त्यामुळे नवा अध्यक्ष सुप्रिया की पटेल याची उत्सुकता आहे. दरम्यान, अजित पवार यांनी अध्यक्ष पदाबाबत उत्सुक नाहीत. आपल्याला त्यात रस नाही, असे म्हणाले आहेत. त्यामुळे अजितदादा या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. तर अनेकांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी तगादा लावला.
पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पवार यांचा हा निर्णय रुचला नाही. त्यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी तगादा लावला. मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे पवारांचा उत्तराधिकारी कोण या चर्चा सुरु झाल्या आहेत. पवारांचा उत्तराधिकारी म्हटलं की प्रामुख्यानं दोनच नावं समोर होती. यात पहिले त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि दुसरं नाव त्यांचे पुतणे अजित पवार. पण अजित पवार यांनी आपल्याला यात कोणाताही रस नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांचे नाव या शर्यतीतून बाहेर पडले आहे.
पवार यांचा उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच काँग्रेसनंतर राष्ट्रवादीला महिला अध्यक्ष पद मिळू शकते, अशी एक चर्चा आहे. सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदार आहेत. दिल्लीच्या राजकारणात काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे. तसेच कार्यकर्ते यांना समवण्यात त्या नक्कीच यशस्वी होतील, अशी एक धारणा आहे.