राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना ED ने केली अटक

 

ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना अटक केली आहे. ईडीने यापूर्वी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना कथित फोन टॅपिंग प्रकरणात अटक केली होती. कथित को-लोकेशन घोटाळा आणि बेकायदेशीर फोन टॅपिंग या दोन प्रकरणांचा सीबीआयकडून तपास सुरू होता. यामध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांचा सहभाग आहे का? याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत होता. यानंतर अखेर ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत फोन टॅपिंग प्रकरणात रवी नारायण यांना अटक केली आहे.

तीन वर्षे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या सीईओ असलेल्या चित्रा रामकृष्ण यांच्याबाबतचा हा खुलासा झाल्यानंतर शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. चित्रा रामकृष्ण यांच्या ईमेलच्या तपासातून ही संपूर्ण घटना उघडकीस आली असून तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील अनियमिततांशी संबंधित मनी लॉण्ड्रिंगच्या तपासासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीसह अन्य राज्यांतील ४० ठिकाणी मंगळवारी छापे टाकले. दिल्ली, तेलंगणा, महाराष्ट्र, तामिळनाडू, हरयाणा, उत्तर प्रदेश व कर्नाटकातील ३८ ते ४० ठिकाणी छापे टाकून झडती घेण्यात येत आहे. ही ठिकाणे यात आरोपी असलेले काही सरकारी अधिकारी व खासगी व्यक्तीची आहेत, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, ही ठिकाणे मनीष सिसोदिया यांच्याशी संबंधित नाहीत, असेही ते म्हणाले.

Team Global News Marathi: