राणेंची तब्येत बरी नसेल तर राज्य सरकार त्यांच्यावर उपचार करेल : नाना पटोले

 

मुंबई केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची काल महाड इथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करत असताना वादग्रस्त विधान केले होते आणि मुख्यमंत्र्यांना कानाखाली मारण्याची भाषा नारायण राणेंनी केली. यानंतर शिवसेनेने नाशिकमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच काल नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसेच त्यांना कोर्टाने जमीन मंजूर केला होता.

यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या तब्येतीवर भाष्य केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची तब्बेत ठीक नसेल तर सरकार उपचार करेल, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राणेंवर टिका केली. राज्यात खऱ्या अर्थाने नव्या नव्या घटना भाजपा तर्फे घडत आहेत. त्या कधी घडल्या नाहीत. राणेंच्या वक्तव्याचा काँग्रेसच्या वतीने निषेध केला. एक केद्रींय राज्यमंत्री पंतप्रधानांना बैल म्हणतात. मुख्यमंत्र्यांच्या बाबत असं विधान करणं चुकीचंय.

पुढे बोलताना पटोले म्हणाले की, यांची जीभ कशी घसरते. कायद्या पेक्षा कोणी मोठा नसतो. कायदेशीर कारवाई होणार, असंही ते म्हणाले. हल्ली सोशल मीडियावर सुद्धा कोणी बोललं तर करवाई ही होतेच. राणेंच्या वक्तवव्याचा जर कुणी समर्थन करत असेल तर त्यांना लखलाभ, असंही ते म्हणाले. आता पटोले यांच्या टीकेला हजपा काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: