राणे यांच्या तब्बल ९ तास चौकशीच्या मुद्द्यावर आशिष शेलार महाविकास आघाडीवर भडकले,

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांची शनिवारी मालवणी पोलीस ठाण्यात तब्बल सलग ११ तास चौकशी करण्यात आली. नारायण राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी राणेंना पोलीस ठाण्यात फक्त बसवून ठेवल्याचा दावा केला होता. त्यानंतर राणेंनीदेखील प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.

राणे पितापुत्रांना सलग 11 तास चौकशीला बसवणं हे भाजपच्या देखील जिव्हारी लागले आहे. त्यामुळेच भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. ईडीकडून करण्यात आलेल्या या कारवाईवरुन सत्ताधारी पक्षाकडून भाजपवर टीका केली जातेय.

या टीकेलाही आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलं. “केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईला राजकीय सूडबुद्धी म्हणणारे गप्प कसे? केंद्रीय मंत्र्याची 8 ते 10 तास चौकशी करता. न्यायालयाने जो गुन्हा गंभीर नाही असे म्हटले यावर एवढे तास चौकशी? नवाब मलिक यांचे समर्थन राज्य सरकार करत आहे. हा बेशर्मपणा आहे. मलिकांच्या राजीनाम्यासाठी भायखळा ते आझाद मैदानपर्यंत चक्का जाम आंदोलन करणार”, अशी घोषणा आशिष शेलारांनी केली.

Team Global News Marathi: