रामराज्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी देशाला सोडले रामभरोसे, नवाब मलिक यांनी पुन्हा साधला निशाणा

संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. आज देशातील विविध राज्यांमध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या देशासाठी नाही तर जगभरासाठी चिंतेचा विषय बनत चालला आहे. त्यात विविध देशातील प्रसिद्ध वृत्तपत्रांनी भारतातील कोरोनाच्या परिस्थितीतवर भाष्य करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यातच बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी जवळपास ५० नागरीकांच्या मृतदेहांचा ढीग लागला होता. हे मृतदेह उत्तर प्रदेशमधून वाहून आल्याची शक्यचा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी घडलेल्या प्रकारावरून भाजपावर टीका केली आहे. रामराज्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी देशाला रामभरोसे सोडले, अशी टीका नेते नवाब मलिक यांनी केली. आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांचे ट्विट रीट्विट करत नवाब मलिक यांनी केली आहे. सध्या या प्रकरणावरून मोदी सरकार आणि उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर सर्व बाजूंनी टीका होताना दिसत आहे.

काय आहे प्रकरण : बिहारमधील चौशा शहरात सकाळी जेव्हा गावकरी नदी किनाऱ्यावर गावकरी पोहोचले. तेव्ह्ज नदीच्या किनारी त्यांना ४० ते ४५ मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले होते. याची माहिती त्यांनी तात्काळ प्रशासनाला कळविली होती. हे सर्व मृतदेह करोना रूग्णाचे असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

“४० ते ४५ मृतदेह पाण्यात तरंगत होते,” अशी माहिती चौशा जिल्ह्याचे अधिकारी अशोक कुमार यांनी दिली आहे. अशोक कुमार यावेळी घटनास्थळी महादेव घाट येथे उभे राहून बोलत होते. हे मृतदेह पाण्यात फेकून दिले असावेत, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. मृतदेहांची संख्या १०० पर्यंत जाऊ शकते, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

 

Team Global News Marathi: