ममता दीदी यांची अहिल्याबाई होळकर यांच्याशी तुलना, भूषणसिंह होळकर म्हणाले संजय राऊत यांची वैचारिक पातळी लक्षात येते

ममता दीदी यांची अहिल्याबाई होळकर यांच्याशी तुलना, भूषणसिंह होळकर म्हणाले संजय राऊत यांची वैचारिक पातळी लक्षात येतेशिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयनानंतर सामना अग्रलेखात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना थेट देवी अहिल्याबाई होळकरांशी केली होती. आता त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद पेटण्याची चिन्ह दिसून येत आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टीकेनंतर आता अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

भूषणसिंह होळकर यांनी थेट मुख्यत्र्यांना पत्र लिहून संजय राऊत यांना समज देण्याचा इशारा दिला आहे. या पत्रात म्हटलंय की, आपल्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा आपल्या मुखपत्रातील लेख वाचला. ज्यापद्धतीने लेख लिहिला आहे. त्यावरून त्यांची वैचारिक पातळी लक्षात येते. आपण पक्ष, राजकारण म्हणून खुशाल एकमेकांवर चिखलफेक करा पण त्यामध्ये आपण जर राष्ट्र पुरुषांची नावे वापरून त्यांची तुलना जर आजच्या नेते मंडळींशी करत असाल तर हे बिलकुल खपवून घेतले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिलाआहे.

त्याचसोबत रयतेचे कल्याण हेच सर्वोपरी मानून संपूर्ण देशात काम करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मासाहेब यांची तुलना राजकीय द्वेषातून आपल्याच लोकांवर अत्याचार करणाऱ्यां आजच्या युगातील एका नेत्याशी कधीच होऊ शकत नाही. आधी अहिल्या मासाहेबांचे विचार आचरणात आणा, त्यांच्या सारखा रयतेचा सांभाळ करा मग जनता ठरवेल आपण त्या योग्यतेचे आहात की नाही.

Team Global News Marathi: