‘रामदास कदम सेनेचे फायरब्रँड नेते, तुम्हाला निवृत्त होता येणार नाही’ – एकनाथ शिंदे

 

रत्नागिरी |”शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे फायरब्रँड नेते आहेत. रामदासभाई तुम्हाला निवृत्त होता येणार नाही. आपली चांगली टीम आहे. समाजाला आपली गरज आहे. पक्षासाठी आणि समाजाच्या हितासाठी आपण स्वतःला झोकून देत काम केले आहे. आमदार योगेश कदम आपल्या मतदारसंघात चांगलं काम करत आहेत.

त्यांना जिथे जिथे निधी लागेल तिथे निधी देण्यासाठी आपण कमी पडणार नाही. भाई आपण केवळ पुस्तके लिहण्याचा विचार न करता आपली ‘सेकंड इनिंग’ जोरदार सुरु करा”, असे मोठे विधान राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये केले आहे. शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी लिहलेल्या ‘जागर कदम वंशाचा’ या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी लिहलेल्या जागर कदम वंशाचा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जामगे येथील कोटेश्वरी मनाई देवीच्या प्रांगणात आज मोठ्या शाही थाटात संपन्न झाला. ‘रामदासभाई डोक्यात काही ठेऊ नका’ राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवसेना नेते रामदास कदम यांच्या बाबत अनेक विषयांवर बोलले. मध्यंतरीच्या कालावधीत आपण दोन पुस्तके लिहिलीत आणि तिसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आम्हाला योग मिळाला.

भाई तुम्ही आता केवळ साहित्यिक बानू नका, बाळासाहेबावांच्या काळातील तुम्ही फायरब्रँड नेते आहात. तुमची आम्हाला आणि समाजाला गरज आहे. अनेक कठीण प्रसंगात पक्षासाठी झोकून तुम्ही काम केले आहे. भाई तुम्ही डोक्यात काही ठेऊ नका. सेकंड इनिंग जोरदार सुरु करा, अशी आमची इच्छा आहे, असे महत्वाचं विधान एकनाथ शिंदे यांनी केले.

Team Global News Marathi: