किरीट सोमय्यांच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण

 

मुंबई | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानेे महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना दिसत आहेत. शिवसेनेतीलही अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर शिवसेना नेते व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आता सोमय्यांच्या रडारवर आले आहेत.

किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर एकूण 26 आरोप केले आहेत. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंची चौकशी होणार असल्याचा खळबळजनक दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी होणार, असा गौप्यस्फोट देखील सोमय्यांनी केला. उद्धव ठाकरेंचे अनेक पार्टनर जेलमध्ये आहेत. हे मी भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली त्याचं यश आहे. आता 7 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी होणार. त्यांना चौकशीला सामोरे जावे लागेलच, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान, आमदार प्रताप सरनाईकांची चौकशी सुरू आहे. संजय राऊतांची मालमत्ता जप्त झाली. खासदार भावना गवळींवर कारवाई झाली. श्रीधर पाटणकर यांची प्रॉपर्टी जप्त झाली. रश्मी ठाकरेंच्या 19 बंगल्यांचं इन्वेस्टिगेशन सुरू आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक जेलमध्ये आहेत, ही मी भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढल्याचं यश आहे, असं सोमय्या म्हणाले. आता थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप लागवल्यामुळे शिवसेना नेते काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: