‘मुँह में राम, जेब में चंदा, चम्पत होगा अब ये बंदा।’ राम मंदिर घोटाळ्याप्रकरणी माजी आयएएस अधिकाऱ्याचा टोला !

राम मन्दिर ट्रस्ट जमीन घोटाळ्याप्रकरणी माहिती समोर आल्यनानंतर विरोधकांनी मोदी आणि योगी सरकारवर जोरदार टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी राम मंदिरासाठी जमीन खरेदी प्रकरणातील कथित घोटाळ्याबाबत मोदी-योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी एकामागून एक ट्विट करत जोरदार निशाण साधला आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की “भगवान श्री राम यांच्या नावावर कोट्यवधींचा घोटाळा चिंताजनक आहे, राम हे समाजातील सर्वात खालच्या स्तरावर उभे असलेल्या व्यक्तीच्या तारणकर्त्याचे नाव आहे. ट्रस्टचे एक विश्वस्त डीएम अयोध्या आणि इतर दोन आयएएस आहेत. ट्रस्टच्या सरचिटणीसकडील आर्थिक अधिकार जप्त करून, सर्व आर्थिक अधिकार दोन जबाबदार लोकांना एकत्रितपणे देण्यात यावेत.” असे ट्विट त्यांनी केले आहे.

 

त्याचबरोबर आणखी एक ट्विट करून ते म्हणाले की, रामजन्मभूमीला मिळालेला 1-1 रुपया राम भक्तांचाच आहे, जे त्यांच्या रामाबद्दलच्या अटूट भक्तीचे प्रतीक आहेत. माझा केंद्र सरकारला असा सल्ला आहे की, या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून ट्रस्टशी संबंधित सर्व आर्थिक अधिकार यंत्रणेशी संबंधित जबाबदार लोकांना मिळेल, जे रामभक्तांना पूर्णपणे उत्तरदायी असतील.

तसेच या माजी आयएएस अधिकाऱ्यांने आणखी एक टोला लगावत ट्वीट केले आहे. यामध्ये लिहिले की, ‘मुँह में राम, जेब में चंदा, चम्पत होगा अब ये बंदा।’ तसेच, पुढे म्हणाले, ‘ट्रस्टने लाखो रामभक्तांचा विश्वास गमावला. सूर्य प्रताप सिंह अनेकदा केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या धोरणांवर टीका करताना दिसतात. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत उन्नावमधील गंगेमध्ये मृतदेह सोडण्याचा मुद्दा प्रमुखपणे उपस्थित केला होता. याप्रकरणी, यूपी पोलिसांनीही त्याच्याविरूद्ध एफआयआर नोंदविला होता आणि चौकशीसाठी बोलविले होते.

Team Global News Marathi: