उद्धव ठाकरे हेच ५ वर्ष मुख्यमंत्री राहतील की नाही ? सुप्रिया सुळे म्हणतात की

मुंबई | राज्यात कोरोनाचे संकट होत असताना दुसरीकडे आता राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात लेखाचं खळबळ माजली होती त्यातच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली. याबाबत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच ५ वर्ष मुख्यमंत्री राहतील असे वक्तव्य करत शिवसेनेची भूमिका मांडत काँग्रेसला टोला लगावला होता. मात्र, पुण्यात एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदी राहतील का राष्ट्रवादी पण दावा करणार? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली.

यावेळी सुळे यांनी राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीबाबा बोलताना मी प्रत्यक्ष त्या बैठकीला उपस्थित नव्हते. यामुळे त्याविषयी जास्त काही सांगू शकत नाही असे म्हणाल्या. तुम्हाला ही असंच वाटतं का ? उद्धव हेच ५ वर्ष मुख्यमंत्री पदी कायम राहतील का ? राष्ट्रवादी दावा क्लेम करणार ? या प्रश्नावर सुळे यांनी ५ वर्षे महाविकास आघाडी सरकार टिकणार हे पवार साहेबांनी सांगितले आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर एकदा पवार साहेब बोलले की आम्ही कुणी बोलत नाही असे स्पष्टपणे सांगितले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कोरोनामुळे संपूर्ण देशात डिजिटल डिव्हाईड तयार झाला आहे. एकूणच शिक्षणाची आणि त्यातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काळजी वाटते .सलग दुसऱ्या वर्षीही अजून प्रत्यक्ष शाळा सुरू नाहीत. मोदींनी लसीकरणावरून राज्यांवर टीका केल्याचा संदर्भ घेऊन त्या म्हणाल्या, लसीकरणावरून एकमेकावर टीका करायची ही वेळ नाही. लवकरात लवकर लसीकरण पूर्ण व्हायला पाहिजे. अमेरिका ओपन अप झाली असे सांगतानाच १२ ते १८ वयोगटात पण लसीकरण सुरू झाल्याचे सांगितले.

Team Global News Marathi: