राकेश टिकैत मोदी आणि योगी सरकारविरोधात लवकरच उभारणार मोठे आंदोलन

 

मागच्या दीड वर्षांपूर्वी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यातील शेतकरी तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवरठाण मांडून बसले होते. दरम्यान विविध शेतकरी संघटनांना एकसंध बांधण्यासाठी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोठे यश मिळवले होते. राकेश टिकैत यांचा केंद्र सरकारला तीन कृषी कायदे मागे घ्यायला लावण्यात मोठा वाटा होता.

आता पुन्हा एकदा राकेश टिकैत सक्रिय झाले आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांवर पूर्ण अत्याचार होत आहेत. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा टाळत असून, येणाऱ्या काळात मोठे शेतकऱ्यांचे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संघटना आणि मोदी सरकार असा नवा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

टिकैत यांनी केंद्र सरकारचा चांगलाच समाचार घेतला, बागपतमधील चौगामा भागातील गंगनौली गावात शेतकऱ्यांची पंचायत झाली. या पंचायतीमध्ये बोलताना राकेश टिकैत यांनी केंद्र सरकार जोरदार निशाणा साधला. केंद्रातल्या सरकार एकतर्फी कारभार करत आहे. त्यांना कोणाची जाण राहिली नाही. सरकारकडून शेतकऱ्यांवर पूर्ण अत्याचार होत आहेत. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा टाळत असून, येणाऱ्या काळात मोठे शेतकऱ्यांचे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला.

Team Global News Marathi: