सरकारने गोदामांचे अधिग्रहण करावं अन्यथा व्यापाऱ्यांची गोदामं फोडू – राकेश टिकैत

केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी अधिक आक्रमक झाला आहे. त्यात प्रजासत्ताक दिनी घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशभराचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले आहे. मात्र तरिही केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यात आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी यांनी राजस्थानमध्ये जागोजागी शेतकऱ्यांच्या सभा आयोजित केल्या आहेत. या सभेला हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित राहत आहेत.

करोली जिल्ह्यातील टोडाभीममधील करीरी गावात ही सभा झाली. या सभेत राकेश टिकैत यांच्यासह योगेंद्र यादव आणि जाट नेते राजाराम मील यांनीही भाषण केले. ४० लाख ट्रॅक्टरचा दिल्लीवर मोर्चा काढण्याचा इशारा टिकैत यांनी पुन्हा या सभेत दिला. यासोबतच आले पुढचे लक्ष्य आता गोदाम असतील. गोदामं फोडले जातील. सरकारने गोदामांचे अधिग्रहण करावं अन्यथा व्यापाऱ्यांची गोदामं फोडू, असा इशारा टिकैत यांनी दिला आहे.

तसेच मार्च महिन्यात देशभरातील विविध ठिकाणी सभा घेण्यात येणार आहेत. यानंतर आसाम, कर्नाटक आणि इतर राज्यांमध्येही जाणार आणि आंदोलन करणार, आंदोलनाचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन दीर्घकाळ चालणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी त्यासाठी तयार रहावे. तसंच शेतकरी आंदोलनात प्रत्येक घरातील एका सदस्याने सहभागी व्हावे, असे आवाहन टिकैत यांनी केले आहे.

Team Global News Marathi: