सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात अढळले 8 हजारापेक्षा जास्त रुग्ण

राज्यात कोरोना संसर्गाचे संकट अधिक गडद होत असताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारची चिंता अधिक वाढताना दिसत आहे. राज्य सरकारने करोनाची ही वाढ रोखण्यासाठी राज्याच्या अनेक भागात पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र अद्याप काही रुग्णसंख्येत घट होताना दिसत नाही.

आज राज्यात ८ हजार ७०२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल बुधवारी ८ हजार ८०७ करोना रुग्ण आढळून आले होते. कालच्या तुलनेत आजचे प्रमाण काही प्रमाणात कमी आहे.

राज्यात आज करोनामुळे ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ८० रुग्णांचा मृत्यू झाला होता सध्या महाराष्ट्रातील मृत्यूदर २.४४ टक्के एवढा आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४९ टक्के एवढे आहे. राज्यात सध्या ३ लाख ५ हजार ७४५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. २,५२१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

तर पुण्यात दिवसभरात ७६६ करोना बाधित रुग्ण आढळले. तर याच दरम्यान चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्याच दरम्यान ३९१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ९१ हजार ६९१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

Team Global News Marathi: