राज्यसभेत विजयाचा गुलाल कुणाचा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतायत की,

 

मुंबई | । राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली असून महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती. एकूण या निवडणुकीसाठी 285 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीमुळे राज्यात राजकीय पक्षांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार कोणता उमेदवार जिकणार आणि राज्यसभाईत कुणाचा गुलाल उडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे. या निवडणुकीत आम्हीच गुलाल उधळणार आहोत. आमचेच उमेदवार जिंकणार आहेत, असे ठाकरे यांनी म्हंटले.

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवन परिसरातून रवाना झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी या निवडणुकीत गुलाल कुणाचा? असा प्रश्न त्यांना माध्यमांनी विचारला असता त्यांनी एका दमात होय. नक्कीच आमचा विजय हा निवडणुकीत होणार आहे. आणि आम्हीच गुलाल उधळणार आहोत. त्यामुळे विजय हा नक्क आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

Team Global News Marathi: