निष्ठावंत शिवसैनिकांचा पराभव;महाविकास आघाडीची मतं फोडून भाजपचे महाडिक विजयी

निष्ठावंत शिवसैनिकांचा पराभव;महाविकास आघाडीची मतं फोडून भाजपचे महाडिक विजयी

मुंबई – देशासह महाराष्ट्रात
बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित व अत्यंत चुरशीची बनलेल्या राज्यसभा निवडणुकीचा निकाल पहाटे चार वाजता जाहिर झाला आहे.हाती आलेल्या निकालानुसार महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून भारतीय जनता पक्षाची खेळी यशस्वी झाली आहे.

पहिल्या फेरीत ५ उमेदवार विजयी झाले असून यात शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, भाजपचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांचा समावेश आहे.तर सहाव्या जागेसाठी अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे संजय पवार विरुद्ध भाजपचे धनंजय महाडिक अशी चुरशीच्या लढतीत महाडिक यांनी बाजी मारली आहे.

राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीची ९ ते १० मतं फोडण्यात यश आलं आहे.भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीपेक्षा जास्त मतं मिळाल्यानं धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे.तर,संजय पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

महाविकास आघाडीचे सहावे उमेदवार संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाला असून पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मतं मिळाली होती.तर,धनंजय महाडिक यांना २७ मतं मिळाली आहेत.मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे

पहिल्या फेरीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये संजय राऊत यांना ४१ मत मिळाली तर प्रफुल्ल पटेल यांना ४३ इम्रान प्रतापगढी यांना ४४ मत मिळाली तसेच पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना ४८ मत मिळाली आहेत.मात्र,शिवसेनेचे संजय पवार यांच्या झालेल्या पराभवामुळे महाविकास आघाडीला अर्थात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

Tags: Maharashtra Government

ग्लोबल न्युज नेटवर्क: