राज्यसभेचं तिकीट न मिळाल्यानं अभिनेत्री नगमा यांची नाराजी

 

काँग्रेसने रविवारी राज्यसभा निवडणूकांच्या 10 उमेदवारांची यादी जाहीर केली ज्यात अनेक ज्यात काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली अभिनेत्री नगमा हिला देखील काँग्रेसनं राज्यसभेची उमेदावारी नाकारली आहे. महाराष्ट्रातून काँग्रेस नेते इमरान प्रतापगढी यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली आहे. यावरुन नगमा यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी इमरान यांच्यावर निशाणा साधत आपली खदखद व्यक्त केलीय.

नगमा यांनी ट्विटमध्ये म्हटलेय, ‘2003-04 पासून जेव्हा पक्ष सत्तेतही नव्हता तेव्हापासून मी काँग्रेसपक्षात आहे. तेव्हा सोनिया गांधी यांनी मला वैयक्तिरित्या शब्द दिला होता की तुम्हाला राज्यसभेत उमेदवारी दिली जाईल. मात्र तेव्हा पासून गेली 18 वर्ष झाली ती वेळ अद्याप आलेली नाही. तर दुसरीकडे इमरान आता राज्यसभेत चालले आहेत.

काँग्रेसने रविवारी जाहीर केलेल्या 10 उमेदवारांच्या यादीत छत्तीसगडमधून राजीव शुक्ला आणि रंजीता रंजन यांना उमेदवारी जाहीर केली. तर हरियाणामधून अजय माकन, कर्नाटकातून जयराम रमेश, मध्य प्रदेशमधून विवेक तन्खा तर महाराष्ट्रातून इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच राजस्थानमधून रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक प्रमोद तिवारी, तमिळनाडू मधून पी. चिदंबरम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इमरान प्रतापगढी यांच्याविषयी बोलायचे झाले तर ते काँग्रेसचे युवा नेता आणि शायर आहेत. त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभा निवडणूकीची उमेदवारी देण्यात आली आहे.

Team Global News Marathi: