राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं मतांचं गणित बिघडणार ?

 

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात रोजच खटके उडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी सुरु आहे. विशेष म्हणजे मुंबईत आज महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठकही झाली. या बैठकीनंतर एक मोठी बातमी समोर आली आहे.

महाविकास आघाडीचं राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतांचं गणित बिघडण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार जेलमध्ये आहेत. त्यांना या निवडणुकीत मतदान करता येण्याची शक्यता कमी आहे. तसेच त्याबाबत महत्त्वाच्या देखील घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल परब हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. नवाब मलिक हे पैशांच्या अफरातफर प्रकरणी आणि अनिल देशमुख हे शंभर कोटी घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

पण कोठडीत असूनही ते राज्यसभेसाठी मतदान करु शकतील, असा अंदाज बांधला जात होता. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी कोर्टात मतदान करता यावं, यासाठी अर्जही दाखल केला होता. पण सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही नेत्यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येण्याची शक्यता फार कमी आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाची सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या सर्व घडामोडी पाहता मलिक आणि देशमुख यांना मतदान करता आलं नाही तर आघाडीचं मतांचं गणित बिघडण्याची शक्यता आहे. मलिक-देशमुखांची कोर्टात धाव, पण ईडीचा झटका दरम्यान, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. याबाबत 8 जूनला सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मलिक आणि देशमुख यांच्या अर्जावरील सुनावणीच्या एक दिवस आधीच ईडीने त्यांच्या अर्जाला विरोध करणारं प्रतिज्ञापत्र कोर्टात दाखल केले आहे.

Team Global News Marathi: