राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व अपक्ष आमदारांना वर्षावर बोलावले

 

राज्यसभा निवडणुकीवरून राज्यात आता राजकीय आखाडा तापला आहे. शिवसेनेनं दुसरी जागा लढवणार अशी घोषणा केली आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. सहावी जागा निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदारांना बैठकीला बोलावले आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आणि त्यानंतर संभाजीराजेंना कोण पाठिंबा देणार अशी चर्चा रंगली होती. राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला पण शिवसेनेनं दुसरा उमेदवार उतरवणार असल्याची तयारी सुरू केली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष आमदारांचे वजन वाढले आहे.

शिवसेनेनं आपला दूसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अपक्ष आमदारांची शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता वर्षा निवास्थानी बैठक बोलवली आहे. या बैठकीत अपक्ष उमेदवार काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी म्हटलं आहे, शिवसेना सहावी जागा लढवणार आणि जिंकणार सुद्धा. राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार!हे दुष्ट चक्र कधी थांबेल?

सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे. जितेंगे. असं ट्विट करत संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेना उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Team Global News Marathi: