राज्यपालांनी पेढा भरवण्यावरुन टोलेबाजी! तर मुनगंटीवार यांचा पलटवार

 

मी कधी राज्यपालांना पेढा भरवला नाही आणि मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा त्यावेळी राज्यपालांनीही कधी मला पेढा भरवला नाही अशा आशयाचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. या टीकेला आता सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिउत्तर देत शरद पवारांना जोरदार टोला लगावला आहे.

 

मुंगटीवार म्हणालेत,” तेव्हाचे जे राज्यपाल आहेत त्यांना कधीच झालेल्या मुख्यमंत्र्यांना पेढा भरवावा असं वाटलं नसेल , लोकशाहीच्या विजयाचा आनंद झाला नसेल, संविधानाच्या तरतुदीच्या सन्मानाचा आनंद झाला नसेल आणि तेव्हा मजबुरीने राज्यपाल महोदयांनी शपथ दिली असा त्यांचा भाव असेल तर कदाचित पेढा भरवला नसेल. त्यासाठी या राज्यपालांना दोष देण्याचं काय कारण आहे? राज्यपाल आणि त्यांनी पेढा भरवणं यावर आक्षेप घेणं म्हणजे मनाचा कोतेपणा आहे.” हे वक्तव्य करत भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पलटवार केलाय.

तसेच विधानसभा अध्यक्ष निवडीवर बोलताना विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी व्हीप लागतच नाही असंही ते म्हणालेत. विधानसभा अध्यक्ष पदाची निवड ही तशी बिनविरोधच होत असते. पण सध्याच्या राजकीय नाट्यानंतर काहीही होऊ शकते. यामुळे महाविकास आघाडीने देखील उमेदवार दिला आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी व्हीप लागतच नाही.

सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांच्या बहुमतावरुन अध्यक्ष ठरविला जात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजकीय नाट्यानंतर या सर्व बाबींवर पडदा पडेल असे वाटत असताना आता अध्यक्ष पदावरुनही राजकारण सुरु झाले आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदारांचेही मत महाविकास आघाडी उमेदवाराला मिळतील असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे.

Team Global News Marathi: