बंडखोरांसोबतची महाशक्ती कोण हे राज्यपालांच्या भूमिकेनंतर दिसून आली

 

देशाच्या जनतेला राज्यात काय सुरू आहे याबाबत माहिती आहे. पुढच्या काही काळात टेक्निकल बाबी पूर्ण होऊन अध्यक्ष कोणाचा होईल हे स्पष्ट होईल. तसंच महाशक्ती कोण आहे हे आम्हाला राज्यपालांच्या भुमीकेनंतर समजले आहे. राज्यात जो काही हुकूमशाही प्रकार सुरू आहे त्याला राज्याच्या राजकीय परंपरेला गालबोट लागल्याचे दिसून येईल. असे माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

ते पुढे म्हणाले कि, भाजपचे नेते वेळ बघून नेहमी बदलत असतात त्यांच्याविषयी काही बोलायचे त्यांनी तर लोकशाहीच्या विरोधात जाऊन काम केले आहे. राज्यपाल मागच्या काही दिवसांत जे काही वागले त्यातून बंडखोर आमदारांची महाशक्ती कोण आहे हे सगळ्या देशाला समजले आहे. शिवसेनेने पक्ष कार्यालय बंद केल्याचा प्रश्न विचारताच नाना पटोले यांनी यावर उत्तर देण्याचे टाळले. पुढच्या काही वेळात विधानसभेचा अध्यक्ष कोण होईल हे महाराष्ट्राला समजेल असे पटोले म्हणाले.

राज्याची जनता सरकारला मान्य करणार नाही, आम्ही जनतेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झोकून काम करणार आहे पुन्हा शिवसेनेला उभारी देण्याचे काम करणार आहे. देशात भाजपने ९ सरकार पाडले परंतु आमची देशातील सगळे विरोध पक्षांची नेहमी चर्चा असते यामुळे देशात भाजपला रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा गैरवापर काल झाल्याचे दिसून आल्याचेही ते म्हणाले.

Team Global News Marathi: