राज्यपाल हे जणूकाही हस्तक म्हणून वागत आहेत, सुषमा अंधारे यांचा टोला

 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा द्यायची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्याकडे केली आहे. राजभवनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. राजकीय जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावेळी केल्याची माहिती आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, राज्यपाल हे जणूकाही हस्तक म्हणून वागत आहेत. राज्यपाल कोश्ययारी यांचे असे वागणे भाजपच्या अंगलट येताना दिसत आहे.

राज्यपाल कोश्यारी यांची गच्छंती करायची आहे. पण, गच्छंती करताना आपल्या पक्षाची प्रतिमा खराब होणार नाही, याची काळजी भाजप घेताना दिसत आहे. पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. यापेक्षा राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत वेगळे काही असेल, अस मला वाटत नाही, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

वंचित आघाडी आणि शिवसेनेची युतीबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, सगळ्या बाजूंचा विचार करूनच पक्ष नेतृत्वाने युतीचा निर्णय घेतला आहे. पक्षनेतृत्वाचा आदेश आम्हा शिवसैनिकांना मान्य आहे. त्यामुळे पक्षाची ही भूमिका आम्ही पुढे नेणार आहोत. आजपासून शिवसेनेत चांगले पर्व सुरू झाले आहे. जेपींची चळवळ कोण्या एका काळात सुरू झाली होती. अशीच चळवळ भाजपच्या दडपशाहीच्या विरोधात महाराष्ट्रचं नव्हे तर भारतभर हे चित्र दिसेल.

Team Global News Marathi: