राज्यातील सत्ता संघर्षावर दाखवण्यात आलेल्या गणेशोत्सव देखाव्यावर पोलिसांची कारवाई

 

शिंदे गटाची बंडखोरी त्यानंतर राज्यात स्थापन झालेले शिंदे-फडणवीस सरकार या बंडखोरीमुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक दुखावले गेले आहे हा सत्तासंघर्षाचा तमाशा दाखविण्याचा प्रयत्न कल्याण मधील विजय तरुण मंडळाने आपल्या गणेशोत्सव देखाव्यातून केला होता. यावर पोलिसांनी आक्षेप घेत देखाव्यावर बुधवारी पहाटे कारवाई करत सामग्री जप्त केली.

या कारवाईबाबत विजय तरुण मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी सांगितले की, यंदाच्या देखाव्यात काहीच आक्षेपार्ह नव्हते. पहाटेच्या सुमारास कारवाई करणे, ही हिटलरशही आहे.आम्ही या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार असून या कारवाईचा निषेध म्हणून आम्ही यंदा गणेश मूर्तीची स्थापना करणार नसल्याचे ते म्हणाले.

कल्याण मधील विजय तरुण मंडळाचे यंदाचे ५९ वे वर्ष आहे. मंडळात बहुतांश शिवसैनिक असून या शिवसैनिकांनी पक्ष निष्ठतेवर गणेश मंडळाचा देखावा साकारला आहे.मात्र मुख्यमंत्री शिंदे यांची ही बंडखोरी कट्टर शिवसैनिकांना रुचलेली नाही. कल्याण मध्ये ठाकरे गटाचे शिवसेनेचे महानगर प्रमुख विजय साळवी यांनी शिंदे गटाला प्रखर विरोध पहिल्यापासून केलेला दिसून आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून भाजपा पक्षासोबत आपला वेगळा संसार थाटून राज्यात सरकार स्थापन केले आहे. ही बाब कट्टर शिवसैनिकांना रुचली नसून आता गणपती मंडळाच्या देखाव्यातून घडलेल्या घटनांवर आधारित चलचित्र देखावे सादर केले जातात. त्या माध्यमातून मंडळाचे म्हणणं मांडलं जातं. आत्ताची सर्वात मोठी घडामोड म्हणजे शिवसेनेत झालेली बंडखोरी, ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलाय.

आम्ही जरी विजय तरुण मंडळाचे विश्वस्थ, कार्यकर्ते असलो तरी आम्ही मूळ शिवसैनिक आहोत. आम्हाला हे रुचलं नाही त्यामुळे ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. शिवसेना ही कोणाच्या एकाच्या जीवावर नाही, शिवसैनिकांच्या जीवावर आहे. शिवसेना एक शिवसैनिक काय म्हणतो हे आम्ही या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे साळवी यांनी सांगितलं होत.

Team Global News Marathi: