राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान

 

राज्यातील 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. त्याचसोबत थेट सरपंचपदासाठीही आज मतदान होणार आहे.त्याचसोबत थेट सरपंचपदासाठीही आज मतदान होणार आहे. मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल 19 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे. तसेच यवतमाळ जिह्यातील 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. 70 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 261 उमेदवार रिंगणात असून सदस्यपदासाठी 1031 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायतींमध्ये गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने या ठिकाणी कडक सुरक्षा ठेवली आहे.

धुळे जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. तर जळगाव जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील 38, आंबेगाव तालुक्यातील 18, खेड तालुक्यातील 05 आणि भोर तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील 45 मतदान होणार आहे.

Team Global News Marathi: