राज्यात निवडणुकांना विलंब का होतोय? प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

 

मुंबई | राज्यात दोन मोठे भूंकप होणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर हा भूंकप टळला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता अजूनही आपण राजकीय भूंकपावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच राज्यात लवकरच दोन भूंकप होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विलंब होत असल्यानं त्यांनी यावरून देखील सरकारवर निशाणा साधला आहे.ज्यावेळी आपण म्हणतो भूकंप होणार आहेत, त्यावेळी त्याचे छोटे- छोटे साईन दिसत असतात. मोठ्या भूंकपाचे संकेत आधीच मिळतात. मी जे स्टेटमेंट केलं आहे, राज्यात दोन भूंकप होणार म्हणून त्यावर मी ठाम असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मात्र इथे मी सर्वच सांगत बसणार नसल्याचंही ते म्हणाले आहेत. निवडणुकांवरून निशाणा राज्यातील अनेक महापालिकांची मुदत संपल्यानं त्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेसोबतच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना देखील विलंब होत आहे. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. निवडणुका झाल्या असत्या तर देशाच्या राजकारणाची दिशा ठरली असती असं मी मानतो. परंतु या सरकारने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, त्याचं एकच कारण आहे ते म्हणजे ते पुन्हा जिंकू शकत नाही हे आता अधोरेखित झाल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: