‘माझा एकनाथ तुझ्यात, तुझा एकनाथ माझ्यात’ नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

 

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह सुरतला पोहोचले हे कळल्यानंतर सोशस मीडियावर मीम्सना उधाण आलं आहे. एका मीमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिसतात. महाविकास आघाडीचं सरकार पडलं तर सत्तास्थापनेसाठी हालचाली वेगवान होऊ शकतात. ते आपल्या कर्मचाऱ्यांना सांगतात, “2 लिटर दूध जास्त सांगा आणि किराण्यात 2 किलो चहा पावडर आणि 5 किलो साखर वाढवा.

‘झपाटलेला’ चित्रपटाचं मराठी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान आहे. या चित्रपटातील बाहुला कमालीचा लोकप्रिय झाला होता. या बाहुल्याचा वापर करून भन्नाट असं मीम तयार करण्यात आलं आहे. “माझा एकनाथ तुझ्यात, तुझा एकनाथ माझ्यात, ओम फट स्वाहा…” असं लिहिलेलं मीम झपाट्याने व्हायरल होतंय. अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकाळचा शपथविधी करून दणका उडवून दिला होता. या सकाळच्या शपथविधीचा संदर्भ देऊन आणखी एक मीम प्रकटलं आहे.

या मीममध्ये ते म्हणताना दिसतात, “काय करायचं ते ते दिवसा करा, जागरणे सोसवत नाहीत आता.राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेत महाविकास आघाडीला चीतपट करणारे देवेंद्र फडणवीस मीमकर्त्यांच्या आवडीचे आहेत. “आग ऐसी लगायी मजा आ गया” असं म्हणणारे देवेंद्र यांचं मीम व्हायरल होतंय. “साला साप को पाल रहा था” असं म्हणणारे मजेशीर मीम व्हायरल होतं आहे.

Team Global News Marathi: