राजीनामा देण्याचा आव्हाडांचा निर्णय पक्षाला मान्य नाही, जयंत पाटील यांचे सूचक विधान

 

आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना नुकतीच ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. शिवाय त्यानंतर त्यांच्याविरोधात विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगत आता जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. या वरून राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली होती.

आव्हाड यांच्या या राजीनाम्यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यामध्येच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. याचा अर्थ लोकांना समजला. आव्हाडांना बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

दरम्यान पुढे जयंत पाटील म्हणाले, आमदारकीचा राजीनामा देण्याचा आव्हाडांचा निर्णय पक्षाला मान्य नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. सरकार पोलिसांचा गैरवापर करत आहे, हे अत्यंत दुर्देवी आहे. मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यादेखत जितेंद्र आव्हाड गर्दीतून वाट काढत असताना हा प्रकार घडला. त्यात कुठलीही विनयभंगाची भावना किंवा कृती असल्याचे दिसून येत नाही. मर्यादा सोडून कोणाचे किती ऐकायचे, याचा विचार पोलिसांनी केला पाहिजे, असे पाटील म्हणाले. राज्यात सध्या जितेंद्र आव्हाड विरुद्ध एकनाथ शिंदे अशी परिस्थिती आहे. आव्हाडांवरील कारवाईनंतर त्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. त्यामुळे भविष्यात सरकारवर नामुष्की ओढवू शकते, असेदेखील जयंत पाटील यांनी सांगितले.

Team Global News Marathi: