आरोप करणाऱ्या महिलेविरोधात ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल

 

भाजप महिला मोर्चाच्या महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आव्हांड यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या रिदा राशिद यांच्याविरोधात एका तरुणाने ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल(atrocity complaint) केली आहे. दलित असल्याने आपल्याला मंदीरात प्रवेश करू दिल्याची तक्रार तरुणाने केली आहे. शिवा जगताप असे या तरुणाचे नाव आहे.

जगताप यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. छटपूजेच्या दिवशी मुंब्रा येथील मुंब्रेश्वर मंदिर परिसरात तलावाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. माझ्यासोबत माझे मित्रही होते. त्यावेळी रिदा रशिदा, सिंदर मुमताज अहमद आणि इतर दोन तीन महिला त्या ठिकाणी उभ्या होत्या. मी दलित असल्याचे रिदा यांना माहीत आहे. मी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ करून मला धक्काबुक्की केली, अशी तक्रार जगताप यांनी केली आहे.

दरम्यान, आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंब्रा बंदची हाक दिली असून, अनेक ठिकाणी टायर जाळून निषेध व्यक्त केला आहे. ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. कुठलेही कारण नसताना पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता या आरोपांमुळे भाजपा आणि राष्ट्र्वादीत वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Team Global News Marathi: