रजेच्या चर्चांवर खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले उद्धव ठाकरेंसह राऊतांना प्रतिउत्तर; म्हणाले,”

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून तीन दिवस रजेवर असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला होता.या सर्वात आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी सुट्टीवर नसून डबल ड्युटीवर आहे, असे ते म्हणाले. तसेच विरोधकांच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, “मी आता सातारा दौऱ्यावर आहे. इथे येऊन मी तापोळ्यातील पुलाची पाहणी केली आणि तापोळा महाबळेश्वर रस्त्याचे भूमिपूजनही केले. तसेच महाबळेश्वर येथील पर्यटनांच्या दृष्टीनेही आढावा बैठकही घेतली, त्यामुळे मी सुट्टीवर आहे, हे खरं नाही. खरं तर मी डबल ड्युटीवर आहे”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. “विरोधक माझ्यावर आरोप करतात कारण त्यांच्याकडे काहीही कामं शिल्कल राहिलेले नाही. त्यांना आरोप केल्याशिवाय दुसरं कोणतंही काम नाही. आम्ही त्यांना घरी बसवलं आहे. त्यामुळे ते आरोप करतीलच. मात्र, आम्ही त्यांना आरोपाचं उत्तर आरोपाने नाही, तर कामाने देऊ”, असे ते म्हणाले. तसेच “मी साताऱ्यात येऊन आराम केलेला नाही. साताऱ्यात आल्यानंतर अनेक जण भेटायला आले. येथील जनतेचे प्रश्न सोडवण्यावर माझा भर आहे. त्यासाठी सातत्याने बैठका होत आहेत”, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Team Global News Marathi: