राजा माने यांचे पुस्तक जिवंत व प्रेरणादायी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

ज्यांनी आभाळ कवेत घेतलं’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

राजा माने यांचे पुस्तक जिवंत व प्रेरणादायी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई: राजकारणातील पदे येतील जातील ,काही काळापुरते राजा माणसे होतील ही पण लेखणीतील राजा माणसे पिढ्या न पिढ्या अमर असतात ते कधीच मरत नाहीत. पुस्तक रूपाने ते कायम जिवंत राहतील असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.

ज्येष्ठ पत्रकार राजा माने लिखित “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..”या पुस्तकाचे लोकार्पण तसेच चित्रकार नितीन खिलारे यांच्या रेखाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झाले.अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे होते. यावेळी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील, लोकमत माध्यम समुहाचे चेअरमन माजी खासदार विजयबाबू दर्डा,लेखक राजा माने,मातृभूमी प्रतिष्ठान चे अध्यक्ष संतोष ठोंबरे,रेखाचित्रकार नितीन खिलारे आदी उपस्थित होते.

 

कोश्यारी पुढे म्हणाले की,रामायण, महाभारत हे ग्रंथ आपण सचित्र वाचले पाहिले आहे मात्र राजा माने यांनी लिहिलेले हे सचित्र पुस्तक वेगळे ठरले आहे. या पुस्तकाचे रूपाने त्यांनी एक वेगळी प्रथा पडली आहे या पुस्तकाची आता पुनरावृत्ती होईल.या पुस्तकात योग्यता आणि टॅलेंट याचा सुंदर मिलाफ आहे.

 

 

देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे तसेच महाराष्ट्र राज्य देखील आपले हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. अश्यावेळी राज्यातील ७५ प्रतिभावंत व्यक्तींचे व्यक्तीचित्रण करणे व त्याला सुंदर रेखाचित्रांची जोड देणे हा नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. राजा माने यांनी आपल्या पुस्तकातून राज्यातील हिरेही दाखवून दिले आणि अमृतही दिले असून त्याचे रसपान वाचकांनी करावे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात राजा माने म्हणाले हिरक आणि अमृतमहोत्सव ज्यांनी राज्यची जडणघडण केली. ज्यांना देश व राज्य ओळखतो त्याना या पुस्तकात मांडले आहे. हे चरित्र नाही तर ज्या माहीत नाही अशा गोष्टी या पुस्तकात आहेत.प्रत्येक क्षेत्रात क्रांती करणाऱ्या मान्यवरांचे वेगळ अंग या पुस्तकात आहे. नितीन खिलारे या उदयोन्मुख चित्रकारानी चित्र काढली.

संतोष ठोंबरे यांनी राजा माने आणि मातृभूमी प्रतिष्ठान च्या कार्याचा आढावा घेतला.ओमप्रकाश शेटे यांनीही विचार व्यक्त केले.

विजय दर्डा म्हणाले, जनतेतून आलेले राज्यपाल. पुस्तकाची गुढी उभी केली. गिरणी कामगारांच्या पोटी जन्म. वार्ताहर ते संपादक प्रवास. समाजजीवन पाहिले, गरिबी पहिली.सामान्य माणूस पत्रकारितेत कायम दिसला. राज्याला समृद्ध केलेली अचूक माणसांची अचूक निवड.जीवनात कलात्मक माणसांचा सहवास. पुस्तक नक्की वाचनीय होईल. केवळ चरित्र नाही. नवीन पिढीला प्रेरणा मिळेल. यात सर्व क्षेत्रातील माणसे आहेत. राजकारण आपण पाहत आहे. राज्याला मोठी परंपरा आहे. पवार ठाकरे राजकीय नाते आपणास माहीत आहे. राजकारणापासून नव्या पिढीला आदर्श मिळाला पाहिजे असा आशावाद व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कर्तृत्ववान माणसांमुळे माणसांमुळे समाज उभा राहत असतो. अशा व्यक्तींमुळे इतरांना प्रेरणा मिळत असते. अशाच कर्तृत्व आणि नम्रता कमी होत असताना या दोन्हीचे कॉम्बिनेशन असलेली माणसे या पुस्तकात पहायला मिळतात.राजा माने यांच्या या पुस्तकाच्या अधिक आवृत्या निघतील असे सांगत राजा माने यांचे कौतुक केले.

*पुस्तक विकत घेऊनच वाचावे*

पुस्तक प्रकाशनाच्या वेळी पुस्तकाच्या प्रती उपस्थितांना मोफत देण्याच्या प्रथेला विरोध करताना प्रत्येकाने पुस्तक विकत घेऊनच वाचावे अशी आग्रही सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी केली. यावेळी राज्यपालांनी स्वतः पैसे देऊन ‘ज्यांनी आभाळ कवेत घेतलं’ या पुस्तकाची प्रत विकत घेतली.

.सुत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार अविनाश सोलवट यांनी आभार मानले. यावेळी उद्योजक रागिणी कंदाकुरे, नामदेव खराडे, शहाजी पवार, मोहन डांगरे, सायली जोशी, तुकाराम कंदाकुरे,माजी सनदी अधिकारी दिनकरराव जगदाळे, के एल प्रसाद, प्रशांत बडवे, कापूस महामंडळाचे अरुण उन्हाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: