“राज ठाकरे कधी आयुष्यात जय भीम म्हणाले का?

 

राज ठाकरेंनी आयष्यात कधी जय भीम म्हंटलं का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. हा सवाल राज ठाकरेंच्या गुडीपाडवा मेळाव्यातील भाषणावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आता आव्हाड यांच्या या टीकेमुळे राष्ट्रवादी आणि मनसे पक्षातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, गुडीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांना अचानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा पुळका आला. आयुष्यात कधी यांनी जय भीम म्हंटल आहे का? एका समाजाबद्दल द्वेष पसरवून तुम्ही दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नका. महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट आहे असे म्हणणारे व तरुणांना रोजगार देऊ म्हणणारे राज ठाकरे हे आज हनुमान चालिसा म्हणायचे रोजगार तरुणांना देत आहेत.

राज ठाकरेंच्या गुढीपाडवा भाषणावर अनेक क्रिया प्रतिक्रया उमटत आहेत. मदरश्यांमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी घडून येत असल्याचा राज यांनी आपल्या भाषणात म्हंटले होते. त्यावर आव्हाड म्हंटले कि, “मदरशामध्ये दाढी करण्याचा वस्तरा जरी मिळाला तरी राजकारण सोडेन. उगाच दोन समाजामध्ये तेढ राज ठाकरेंनी वाढवू नये”.

Team Global News Marathi: