“त्यांनी आपल्या नवीन बंगल्यात आंबेडकरांची प्रतिमा लावून.” मिटकरींनी साधला निशाणा

 

आपण जशी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तितक्याच उत्साहात साजरी झाली पाहिजे. महाराष्ट्राला ज्यांनी ज्यांनी दिशा देण्याचं काम केलं. त्यांच्या जयंत्या मोठ्या प्रमाणात साजऱ्या झाल्या पाहिजेत. हा महाराष्ट्र जिवंत आहे, हे देशाला कळलं पाहिजे. असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात केले. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना सल्ला दिला आहे.

मिटकरी ट्विट करून म्हणतायत की, “त्यांनी आपल्या नवीन बंगल्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावुन रोज दर्शन घ्यावे आणि मग आम्हाला बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचे सल्ले द्यावेत, आणि शक्य झाल्यास संविधानातील “धर्मनिरपेक्षता” समजुन घ्यावी. तोंडाचा भोंगा आपोआप बंद होईल.”, असा खोचक सल्ला अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत दिला आहे.

तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला गेल्यानेही एका वेगळ्याच चर्चांना उधान आले आहे. यावरही अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “ते स्वतःहून भेटीला आले नसावेत, नवीन घर बांधल्यानंतर घराला सोयीनुसार भेट द्या ह्या आर्जव विनंतीला मान देऊन सहज चहापाण्याला आलेत. आणि आता चालीसा कसा गायचा ही कार्यशाळा , तरीही हाती काही लागणार नाही.” असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे.

Team Global News Marathi: