राज ठाकरेंच्या ‘हिंदुत्ववादी भोंग्या’ला पक्षातूनच नकार, भोंगा न लावण्याची पुणे मनसे शहराध्यक्षांची भूमिका

 

पुणे | मशिदीवरील भोंगे बंद केले नाही तर त्या मशिदींसमोर मनेसकडून दुप्पट भोंग्यांवर हनुमानचालिसा लावू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढपाडव्याच्या जाहीर सभेत दिला होता. मात्र राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर पक्षात दुमत असल्याचे चित्र दिसून आले आहे आता राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर मनसेतूनच नकार मिळू लागला आहे.

पुणे मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्यासाठी हा निर्णय धक्का असल्याचे संकेत आहेत. त्यांच्या आणि साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लीम मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आमच्या प्रभागात भोंगे लावणार नाही, अशी भूमिका मोरे यांनी घेतली आहे. रमजानचा काळ असल्याने शांतता राखण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेचा विपर्यास केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता कोणती भूमिका घ्यावी, असा संभ्रम निर्माण असल्याचेही त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. मोरे आणि बाबर हे राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र ती चर्चा वसंत मोरे यांनी फेटाळली आहे. राज ठाकरे यांच्यावर नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Team Global News Marathi: