राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची वांद्रे येथे विशेष बैठक

 

मुंबई :मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना महराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा जोरदार तयारी सुरु केली असून आता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी मुंबई आणि इतर महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या गुडीपाढव्याला पार पडणाऱ्या मनसेच्या मेळाव्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी मनसेने तयारीचा वेग वाढविला आहे.

याच पार्श्वभूमीवरआज सोमवारी मुंबईत मनसेची विशेष बैठक वांद्रे येथील एमआयजी येथे पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीमध्ये राज ठाकरे मनसे नेत्यांना येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

गुढीपाडव्याच्या निमित्ताने होणाऱ्या मेळाव्याला राज्यातून दरवर्षी लाखो मनसे कार्यकर्ते शिवाजी पार्क येथे दाखल होतात. त्यामुळे या सभेच्या तयारीसाठी मनसेतर्फे सोमवारी वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत नेते, सरचिटणीस आणि विभाग अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आल्याचे कळते. राज ठाकरे स्वत: या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने राजकीय विश्लेषकांचे लक्षदेखील या बैठकीकडे लागून राहिले आहे.

Team Global News Marathi: